Kisan Credit Card Scheme

शेतकऱ्यांना KCC वर किती स्वस्त कर्ज मिळते आणि त्यासाठी काय करावे; जाणून घ्या.. | Kisan Credit Card Scheme

Kisan Credit Card Scheme: शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणारी विविध प्रकारची खते, बियाणे, औषधे, शेती यंत्रसामग्री, पशुधन खरेदी, इत्यादींसाठी (Loan) कर्जाची आवश्यकता असते. यासाठी शेतकऱ्यांना सावकारांकडून किंवा नातेवाईकांकडून जास्त व्याजदरानं कर्ज घ्यावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्या सोडवण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दोन ते चार टक्के व्याजदराने मिळते.

किसान क्रेडिट कार्डवर किती कर्ज मिळते?

किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. यामध्ये शेतीव्यतिरिक्त मत्स्यपालन किंवा पशुसंवर्धनाशी संबंधित लोकांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. या अंतर्गत त्यांना फक्त 2 लाख रुपयांचे कर्ज पशुसंवर्धनासाठी दिले जाते. या योजनेअंतर्गत 1.6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध करून दिले जाते.

किसान क्रेडिट कार्डचा व्याज दर किती?

केंद्र सरकारने सर्व बँकांना किसान क्रेडिट कार्डवर 4 टक्के दराने कर्ज देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं त्याच व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. पैसे वेळेवर जमा केले नाहीत तरच पूर्ण व्याज द्यावे लागते. सवलत कालबाह्य होते. सवलतीशिवाय व्याजदर 9 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. कार्डधारकांनी वेळेवर पेमेंट न केल्यास चक्रवाढ व्याज आकारले जाते.

हे ही वाचा » आठवड्याच्या शेवटी सोयाबीन दरात काय बदल झाला, जाणून घ्या..

किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • योजनेचा भरलेला अर्ज
  • ओळखपत्र- यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असे काहीही देऊ शकता.
  • पत्ता पुरावा, यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स देखील देऊ शकता.
  • जमिनीची कागदपत्रे
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

किसान क्रेडिट कार्डचे फायदे:

  • शेतकऱ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने कर्ज मिळते.
  • शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळते.
  • शेतकऱ्यांना कर्जासाठी कोणतीही हमी द्यावी लागत नाही.
  • शेतकऱ्यांना कर्जासाठी जास्त कागदपत्रे सादर करावी लागत नाहीत.

हे ही वाचा » चिंता वाढली! 13 हजारांवर गेलेले तुर दर आले खाली; पहा आजचे बाजारभाव

किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे?

किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरील सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. बँक तुमचा अर्ज तपासून तुमच्या पात्रतेनुसार कर्ज मंजूर करेल.

शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे कर्ज सहज आणि सोप्या पद्धतीने मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही.


Scroll to Top